सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये विचारला ‘या’ सरकारच्या कर्जमाफीबद्दल प्रश्न? चॅनलने दिले स्पष्टीकरण

अमिताभ बच्चन यांनी शोमध्ये विचारला ‘या’ सरकारच्या कर्जमाफीबद्दल प्रश्न? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चॅनलने दिलं स्पष्टीकरण आहे.

Shruti Turkane
  • Nov 18 2023 9:48AM

टीव्हीवरील लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ हा क्विझ शो आहे. सध्या त्याचे १५ वे पर्व सुरू आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हा शो होस्ट करत आहेत. हा शो दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालला आहे. देशभरातील अनेक स्पर्धक या शोमध्ये आपलं नशीब आजमवतात आणि त्यापैकी काही जण विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन चांगली रक्कम घरी घेऊन जातात. पण सध्या या शोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन स्पर्धकाला मध्यप्रदेशबद्दल प्रश्न विचारतांना दिसतात. मध्य प्रदेशमध्ये सध्या निवडणुका चालू आहेत, याचदरम्यान केबीसीमधील हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. अमिताभ स्पर्धकाला विचारतात, ‘२०१८ मधील कमलनाथ सरकारने किती शेतकऱ्यांची कर्ज माफी केली होती?’ यासाठी ते चार पर्यायही स्पर्धकाला देतात. त्यापैकी स्पर्धक २७ लाख रुपये असलेला पर्याय निवडतो. त्याचं हे उत्तर बरोबर असल्याचं अमिताभ सांगतात, असा हा व्हिडीओ आहे.

दरम्यान, आता चॅनलने हा व्हिडीओ शेअर करत तो बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. हा प्रश्न अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये कोणत्याही स्पर्धकाला विचारण्यात आला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं आहे. सोनी टीव्ही चॅनलने आपल्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ व एक स्टेटमेंट जारी करत या व्हिडीओचे सत्य उघड केले आहे. “कौन बनेगा करोडपतीचा हा बनावट व्हिडीओ लोकांची दिशाभूल करत आहे. तुम्हाला खरा एपिसोड बघायचा असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलवर जा,” असं त्यांनी म्हटलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार