सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परवडणारी सार्व. वाहतूक व्यवस्था प्रत्येकाला उपलब्ध व्हावी : ना. गडकरी

केपीआयटी स्पार्कल 2021 पारितोषिक वितरण संपन्न झाले. महामार्ग-रस्त्यांचे सर्वाधिक लांबीचे जाळे असलेला आपला देश दुसर्‍या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Snehal Joshi. MH
  • Mar 9 2021 7:49AM

 
 
 
 
 
देशातील प्रत्येक नागरिकाला परवडणारी आणि सहज उपलब्ध असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असून आज महामार्ग-रस्त्यांचे सर्वाधिक लांबीचे जाळे असलेला आपला देश दुसर्‍या क्रमांकावर असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
‘केपीआयटी स्पार्कल 2021’च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकार्‍यांशी ई  संवाद साधताना ना. गडकरी म्हणाले-रस्ते-महामार्गाचे जाळे वाढत असताना तरुण अभियंत्यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यकता आहे. कार्यक्षम, परवडणारी आणि जलद वाहतूक व्यवस्थेसाठी तरुण अभियंत्यांची मदत, कल्पना मोलाची ठरणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे आवश्यक असून शहरातील प्रत्येक भागात सेवा देऊ  शकेल अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आपल्याला गरज आहे, असेही ते म्हणाले.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सिटी बस, टॅक्सी, ऑटो, दुचाकी आता इलेक्ट्रिक इंधनावर चालणारी पाहिजे. पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून जैविक इंधनाचा वापर आवश्यक आहे. जैविक इंधन, ई व्हेईकल यामुळे पेट्रोल डिझेल आयातीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. सोबतच पर्यावरणाचे रक्षण करणेही शक्य होईल. बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. सोडियम आयन, अ‍ॅल्युमिनियम, झिंक आयन व हायड्रोजन पासून निर्माण होणार्‍या इंधनावर संशोधन सुरु आहे. भविष्यात वाहतुकीसाठी या इंधनाचा वापर करावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.
येत्या काही काळातच भारत शाश्वत वाहतुकीच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करू शकतो, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नावीन्य, संशोधन, तंत्रज्ञान, विकास, उत्तम डिझाईन याची आम्हाला आवश्यकता आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी ब्रॉड गेज मेट्रोची संकल्पनाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत दिव्यांगासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असाव्या. वाहनाला कमी उंचीच्या पायर्‍या, दिव्यांगाना व्हील चेअरसह बसण्याची व्यवस्था असावी, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार