सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*शहरात संचारबंदी असताना तरुणाचा चाकूने भोसकून खुन*

संभाजीनगर बॅंकेची परिक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.

Sudarshan MH
  • Apr 9 2021 4:02PM

संभाजीनगर बॅंकेची परिक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. विकास देवीचंद चव्हाण (२३, रा. पाथर्डी, जि. नगर) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विकास याचा एक हात पूर्णपणे छाटण्यात आला असून त्याच्या अंगावर भोसकल्याच्या खुना आहेत. महापालिका मुख्यालयाजवळील कब्रस्तानमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला होता. शहरात रात्रीची संचारबंदी लागू असतानि देखील हा खून झाला यामुळे संचारबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 आज सकाळी साडेसात वाजता मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान सिटी चौक पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर निरीक्षक संभाजी पवार यांनी कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान विकासचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगावर भोसकल्याच्या जखमा आढळून आल्या, तसेच त्याचा एक हात छाटल्याचे दिसून आले. मात्र छाटलेला हात घटनास्थळी आढळला नाही. घटनास्थळी पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव आदिंनी भेट दिली. यावेळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी, श्‍वान पथक पाचारण करण्यात आले होते. श्‍वानाला कब्रस्तानाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ एक बॅग आढळून आली, त्यामध्ये मृत विकासचे परिक्षा प्रवेशपत्र, इतर कागदपत्रे आढळून आली. दरम्यान विकासच्या नातेवाईकांशी संपर्क करुन त्यांना माहिती देण्यात आली असून नातेवाईक संभाजनगर येत असल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

रात्रीच्या संचारबंदीवर प्रश्‍नचिन्ह-
एकीकडे रात्रीची संचारबंदी असताना असे प्रकार घडल्याने पोलिसांची कार्यतत्परता, संचारबंदीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. विकासचा खुन कशामुळे, कोणी केला याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार