सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा प्रमाणिकपणा… रस्त्यात सापडलेली सोन्या चांदीची दागिने असलेली अंदाजे 60 हजार रुपये किमतीची बॅग मूळ मालकाचा शोध घेऊन अप्पर पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकास परत.

लातूर काल दिनांक 28/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस अंमलदार राजाभाऊ मस्के, माधव बिल्लापटे,नितीन कठारे हे एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत गांधी चौक परिसरात फिरत होते. तेव्हा त्यांना रस्त्यावर एक बेवारस बॅग पडलेली दिसली. ती बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्या- चांदीचे दागिने व काही कागदपत्र दिसून आली.नमूद अंमलदारांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांना दिली.

S.n.ranjankar
  • Dec 29 2021 6:05PM
लातूर काल दिनांक 28/12/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील पोलीस अंमलदार राजाभाऊ मस्के, माधव बिल्लापटे,नितीन कठारे हे एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत गांधी चौक परिसरात फिरत होते. तेव्हा त्यांना रस्त्यावर एक बेवारस बॅग पडलेली दिसली. ती बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्या- चांदीचे दागिने व काही कागदपत्र दिसून आली.नमूद अंमलदारांनी सदरची माहिती पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांना दिली.पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांच्या निर्देशांन्वये सदरच्या कागदपत्रांवरून बॅगच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तेव्हा ती बॅग दादोजी कोंडदेव नगर, लातूर येथे राहणारे राजू प्रभाकर वेदपाठक यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यांना संपर्क साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेण्यात आले. राजू वेदपाठक यांनी सांगितले की, आज सकाळी काही कामानिमित्त मी गंजगोलाई कडे गेलो होतो. माझ्या मोटार सायकलला लावलेली बॅग त्यामध्ये 04 जोडी सोन्याचे फुले, 06 चांदीचे करंडे, 09 चांदीची कमळे,जोडवे-बीचवे, वाळे आणि सोन्याचा चुरा असा 60 हजार रुपयाच्या चीजवस्तू असलेली बॅग रस्त्यात हरवली होती असे सांगितले.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे हस्ते सदरची बॅग मूळ मालक श्री.राजू वेदपाठक यांना परत देण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे प्रमाणिकपणा बद्दल वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार