सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वाहन चालक दिनानिमित्त लातूरात 47 चालकांचे रक्तदान

जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित वाहन चालक गुणगौरव व मार्गदर्शन सोहळ्यात 47 वाहन चालकांनी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जपली.

s.ranjankar
  • Sep 18 2021 12:48PM


लातूर: येथील जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित वाहन चालक गुणगौरव व मार्गदर्शन सोहळ्यात 47 वाहन चालकांनी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
दयानंद गेट समोर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मोटार परिवहन विभागाच्या निरीक्षक शीतल गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले तर मार्गदर्शक म्हणून एमआयडीसी पोलिस स्थानकाचे पोलिस उप निरीक्षक कल्याण नेहरकर यांनी चालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोटार परिवहन विभागाचे निरीक्षक संदीप लोणारी, शांताराम साठे, ट्रॅव्हल्स असोसिएशनचे जुगलकिशोर तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते दीपक मिरकले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व उपस्थित चालकांना सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे योगेश शिंदे, नईम शेख, प्रवीण गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार