सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज ठाकरे मोकळ्या मनाचा माणूस, कोत्या मनोवृत्तीचा नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

Shruti Patil
  • Apr 24 2024 11:24AM

मुंबई: राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय अगदी योग्य असून त्यांनी देशाच्या विकासाला महत्त्व दिले आहे. तसेच, राज ठाकरे हे अगदी मोकळ्या मनाचा माणूस असून ते कद्रू किंवा कोत्या मनोवृत्तीचे नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

आम्ही सगळे एकत्र आलो तर निवडणुकीत त्याचा फायदा होणारच आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही. आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला काय द्यायचं, याचा विचार होऊ शकतो, आता काहीच ठरलेले नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार