सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कायदा, सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीयः सुभाष देसाई

राज्यात ‘ब्रेक द चेन; अंतर्गंत लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल करण्यात आले.

Sudarshan MH
  • Jun 2 2021 6:14PM


राज्यात ‘ब्रेक द चेन; अंतर्गंत लावण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल करण्यात आले. संभाजीनगर शहरात देखील सकाळी सात ते २ वाजेपर्यंत सर्व आस्थापना खुल्या करण्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत.
  करोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसरी लाट थोपवण्यातही प्रशासनाच्या चोख कामगिरीमुळे व जनतेच्या उत्स्फुर्त सहकार्यामुळे यश आले. संभाजीनगरची एकूण कामगिरी उजवी ठरली व त्यामुळे प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला स्थान लाभले. अजूनही रुग्णसंख्या वाढत असलेल्या १८ जिल्ह्यांप्रमाणे संभाजीगरात लॉकडाऊन वाढवावा लागला नाही.
  अशात नियम ढाब्यावर बसविणाऱ्या मुठभर व्यापाऱ्यांनी व त्यांच्या समर्थकांनी कामगार उपायुक्तांना धमकावणे व कायदा सुव्यवस्था पायदळी तुडविणे अशोभनीय म्हटले पाहिजे. जिल्ह्यातील २ लोख ९६ हजार ७५६ दुकाने व आस्थापनांपैकी ८२ आस्थापनांनी शासनाच्या निर्बंधांना झुगारून प्रतिबंधीत कालावधीत आपली दुकाने उघडी ठेवली. ८२ पैकी ४६ प्रकरणाची सुनावणी घेऊन त्यांचे सिल उघडण्यास मान्यता दिली. उर्वरित ३६ आस्थपानांची सुनावणी प्रलंबित आहे. त्यांच्यावर टाळेबंदीची कारवाई होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे उर्वरित ९९ टक्क्यांहून अधिक नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांप्रति आदर व्यक्त झाला.
 वास्तविक सर्व मान्यवरांनी नियम व कायदे पाळणाऱ्याचा सन्मान करायचे सोडून कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांची पाठराखण करावी हे अनाकलनीय म्हटले पाहिजे. निर्बंध पाळणारे नागरिक व यंत्रणा राबविणारे अधिकारी-कर्मचारी यांच्यामुळेच करोनाची लाट आपण थोपवू शकलो. आणि पुढेही ही एकजुटच आपल्याला सुरक्षित ठेवील, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार