सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशातील सार्वजनिक वाहतूक कधी होणार सुरू? नितीन गडकरींनी दिले महत्त्वाचे संकेत

देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49,391 पर्यंत पोहोचली असून 1694 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे

Sudarshan MH
  • May 7 2020 10:56AM

देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49,391 पर्यंत पोहोचली असून 1694 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात देशातील बस, रेल्वे, मेट्रो आणि हवाई सेवांसह सर्व सार्वजनिक सेवा बंद आहेत.

यादरम्यान केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बुधवारी त्यांनी सांगितले की, देशातील सार्वजनिक परिवहन सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सरकार यासाठी गाइडलाइन्स तयार करीत आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आदी नियम लागू करण्यात येतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी बस आणि कार ऑपरेटर्स कॉन्फरडेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांसह बातचीत करीत ही प्रतिक्रिया दिली. ही चर्चा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती.

पॅसेंजर ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीच्या विविध मागण्यांवर नितीन गडकरी म्हणाले की, सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल. गडकरी सातत्याने पीएम मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या संपर्कात आहेत. दोघेही भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे गडकरी यावेळी म्हणाले. गडकरी यांनी गुंतवणूकदार आणि इंडस्ट्रींशी चर्चा केली आहे. या चर्चेत कोविड 19 संकटाच्या या परिस्थितीचा लाभ ग्लोबल मार्केटमध्ये घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर चिंतेच सावट आहे. आता चीनसोबत कोणताही व्यापार करू इच्छित नाही. अशा परिस्थिती आपणास याचा लाभ घ्यायला हवा. जपानचे पंतप्रधानही गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी ही चांगली संधी आहे’, असे नितीन गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार