सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ममत बॅनर्जींची मोठी घोषणा

पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल प्रचार शिगेला पोहोचला असताना आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाबाबत मोठी घोषणा केली आहे.

Sudarshan MH
  • Jan 10 2021 11:55AM

पश्चिम बंगालमध्ये पुढच्या काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांना सत्तेतून बाहेर करण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहही यात फारसे मागे नाहीत. याच दरम्यान आता ममता बॅनर्जी यांनी काउंटर स्ट्रॅटेजी म्हणून मोठी घोषणा केली आहे. भाजपचं कमळ फुलू न देण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शह देण्यासाठी आता ममता बॅनर्जींनी नवी खेळी केली आहे.

पश्चिम बंगालमधील जनतेसाठी कोरोनासंदर्भात सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. या निर्णयाचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनाची लस मोफत देण्याबाबत घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याबाबत राज्य सरकार नियोजन करत असल्याची माहिती ममत बॅनर्जी यांनी ट्वीट करून दिली आहे.

 

 

 

देशात 16 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ही मोठी घोषणा केली आहे. याचे पडसाद अर्थातच येऊ घातलेल्या निवडणुकींवर होणार आहेत. भाजप विरुद्ध तृणमूल अशी चुरशीची लढत असताना ममता बॅनर्जींचा हा निर्णय पुन्हा एकदा पश्चिम बंगालचा गड राखण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

पश्चिम बंगालमध्ये कधी होणार निवडणुका?

साधारण पश्चिम बंगालमध्ये मार्च ते एप्रिल 2021 दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं या संदर्भात अद्याप तारखा जाहीर केल्या नाहीत. मात्र तिथे प्रचाराचा जोर आणि रणधुमाळी रंगात आली आहे. लोकसभा निवडणुकीला भाजपने तृणमूल काँग्रेसला टफ फाइट दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी देखील कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर स्वत: प्रचारासाठी देखील गेले होते.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी एकूण 294 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 148 जागा जिंकण आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर आता पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. याचा फायदा भाजप उचलणार का? भाजप कशा पद्धतीनं पुढची दिशा ठरवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार