सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत आज 62 टक्के इतका पाणीसाठा झाला

पावासाने मोठी उसंत घेतली आणि त्यामुळे सर्वात कमी क्षमतेचं धरण भरण्यासाठी आजपर्यंतचा वेळ लागला.

Aishwarya Dubey
  • Aug 12 2020 11:12AM

 पुण्यासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत आज 62 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरण 100 टक्के भरलं होतं. यंदा मात्र, पावसाने दरवर्षीप्रमाणे जोर पकडलेला नाही आणि घाटमाथ्यावर पावसाच प्रमाण कमी झाल्याने धरण अजून ही भरलेली नव्हती. खडकवासला धरण हे आठ दिवसापूर्वी पूर्ण भरेल अशी शक्यता होती. मात्र, पावासाने मोठी उसंत घेतली आणि त्यामुळे सर्वात कमी क्षमतेचं धरण भरण्यासाठी आजपर्यंतचा वेळ लागला.

खडकवासला धरणसाखळीतला पाणीसाठा

खडकवासला 99.16%

पानशेत 70.75%

वरसगाव 58.28%

टेमघर 44.95%

एकूण पाणीसाठा 18.63 टीएमसी

चारही धरणांची मिळून टक्केवारी 63.91 %

दरम्यान, आज खडकवासला धरणातून अखेर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 10 वाजता धरणाचे दरवाजे उघडले असून 500 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर रात्री झालेला पाऊस खडकवासला धरण आणि इतर धरण क्षेत्रात समाधानकारक होता. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली असं म्हणायला हरकत नाही.

गेल्यावर्षी 11 ऑगस्टअखेर खडकवासला प्रकल्पात 29.15 टीएमसी (100 टक्के) पाणीसाठा होता. यावर्षी ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस होत असून, धरणांतील पाणीसाठा जवळपास 63 टक्क्यांपर्यंत पोचला आहे. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या पाहता दर महिन्याला साधारण दीड टीएमसी पाणी लागतं. त्यामुळे आता वाढलेल्या पाण्यामुळे वर्षभर पुणेकरांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार