सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मा वनमंत्री व आमदार संजय राठोड यांचा महाराष्ट्र दौरा वसईतील घाटीआळी व देवीपाडा तांडातून सुरुवात

महाराष्ट्र दौरा वसईतील घाटीआळी व देवीपाडा तांडातून सुरुवात

Sudarshan MH
  • Apr 8 2021 9:40AM
                    
 
वसई - ( मनीष गुप्ता ) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्या नंतर,स्वस्थ न बसता संपूर्ण महाराष्ट्रातील गावपाड्यातील तांड्या तांड्यावर जाऊन, समाजाच्या वेदना,जाणून घेऊन,समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे आमदार संजय राठोड महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरवात पालघर जिल्ह्यातील वसईतून केले वसईतील बंजारा समाजासोबत भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडीअडचणी उपस्थित बंजारा समाजाचा समस्या ऐकून घेतला तसेच मी तुमच्या सोबत आहे तुम्ही माझ्या बदनामीच्या वेळी माझा सोबत होते तर मी कोरोनाच्या वेळेस तुमच्या सोबत असणार आहे आश्वासन आमदार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले
   आमदार संजय राठोड सोमवार रोजी पालघर दौऱ्यादरम्यान कोरोनाच्या नियमांचे सर्व पालन करावे असे आवाहन बंजारा समाजाला यावेळी सांगितले जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा समन्वय समिती सदस्यांची सदिच्छा भेट घेऊन,कोरोना काळात मजूरी करणारे जिल्ह्यातील गोर बंजारा समाजाचे नागरीक व तांड्यातील समस्यां जाणून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केल्या जाणार आहे पोहरागड येथे होणाऱ्या नंगारा संग्रहालयासाठी आवश्यक असणाऱ्या समाजातील दुर्मीळ, वस्तू,दस्तावेज,चलचित्रांचे संकलन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील गोर बंजारा बहूल मतदारसंघ तसेच प्रमुख तांड्याना भेटी देणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील दौरा आढावा घेऊन नंगारा संग्रहालयाची अंतर्गत बाबी निश्चित करणे व प्राप्त समस्यांवर राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी आमदार संजय राठोड प्रयत्न करणार आहे. उपस्थित पत्रकारांना बोलताना सांगितले यावेळी दौऱ्यावर असताना अचानक एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला व दौरा दरम्यान बंजारा समाजातील एका गरीब कुटूंबातील लग्न असल्याचं कळल्यानंतर भेट देऊन शुभेच्छा आमदार संजय राठोड यांनी दिले यावेळी या दौऱ्यात प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष सहभाग घेतला 
राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष विलास जाधव, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख मच्छिंद्र चव्हाण (पत्रकार), प्रदेश समनव्यक रवी राठोड,जिल्हा अध्यक्ष अतुल राठोड,जिल्हा प्रवक्ता पंजाब राठोड,तालुका अध्यक्ष दिनेश राठोड, उपाध्यक्ष विजय चव्हाण (सैनिक संस्था), सचिव पन्नालाल चव्हाण,सल्लागार अमरसिंग चव्हाण,सल्लागार किशोर चव्हाण व इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी समाजाच्या समस्या वनमंत्री व आमदार संजय राठोड यांच्याकडे मांडला

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार