सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाच्या काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली

नराधमांनी अल्पवयीन मुलीचे डोळे फोडले आणि जीभही कापली कापल्याची माहिती समोर आली आहे.

Aishwarya Dubey
  • Aug 16 2020 10:36AM

लखीमपूर : कोरोनाच्या काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यात ईशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भयंकर प्रकार घडला. शुक्रवारी पोलिसांना उसाचा शेतात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि रिपोर्ट पाहून पाया खालची जमीनच सरकली.

मुलगी खूपवेळ घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली त्यानंतर पोलिसात मुलगी घरी आली नसल्याची माहितीही दिली. उसाच्या मळ्यात 13 वर्षांची अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला.

अल्पवयीन मुलगी शेतात शौचालयासाठी गेली होती. तिथून जाणाऱ्या गावातील दोन मुलांनी या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. बलात्कारानंतर या तरुणांनी तिचे हाल केल्याचं दिसत होतं. जीभ कापली होती आणि डोळे फोडले होते. गळ्यातील ओढणीनं तिला खेचल्याचे व्रणही मृतदेहावर उठल्याचं दिसत होतं. उसाच्या शेतात हा मृतदेह फेकून दोघंही तरुण फरार झाले.

शवविच्छेदन अहवालात सामूहिक बलात्कार आणि गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार