सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

8 जूनपासून मॉल, मंदिर आणि रेस्टॉरंटसाठी नवी नियमावली

Unlock 1.0: मॉल, मंदिर आणि रेस्टॉरंटचे 8 जूनपासून बदलणार नियम

Aishwarya Dubey
  • Jun 5 2020 9:28AM

नवी दिल्ली, 05 जून : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी 70 दिवसांच्या लॉकडाऊननंतर हळूहळू सेवा-सुविधा सुरू करण्यात येत आहे. जून महिन्यात unlock 1.0 च्या पहिल्या टप्प्यात अर्थव्यवस्थेचा एका मोठा हिस्सा सुरू करण्यात येत आहे. मॉल, मंदिर किंवा रेस्टॉरंटमध्ये आता पूर्वीसारखं आपल्याला फिरता येणार नाही. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारनं नियमावली तयार केली आहे. मॉल्स, मंदिर आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 8 जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

धार्मिक स्थळ, मॉल्स आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. त्यापार्श्वभूमीवर या सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये मॉल्स, धार्मिक स्थळं, रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स बंदच राहणार आहेत. या ठिकाणी अद्याप उघडण्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं नवी नियमावली जाहीर केली त्यात काय म्हटलं आहे पाहा.

धार्मिक स्थळ, मंदिरांसाठी काय आहेत नवीन नियम

- आपल्या चपला शक्य असल्यास गाडीतच ठेवाव्यात. अन्यथा सोशल डिस्टन्सचं पालन करून त्या योग्य अंतरावर ठेवाव्यात

- मंदिर परिसरात जाण्याआधी साबणानं हात-पाय तोंड स्वच्छ धुवा.

- मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून रांगेत उभं राहावं.

- हाताने प्रसाद, तीर्थ देण्यास मनाई करण्यात आली आहे.

मॉल्ससाठी काय आहे नवी नियमावली

- प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनिंग अत्यावश्यक. थर्मल स्कॅनिंगनंतर कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा.

- पार्किंग आणि मॉलच्या परिसरात सुरक्षित अंतर राखणं अनिवार्य आहे.

- लिफ्ट आणि एक्सलेटरवरून जाताना सोशल डिस्टन्सचं पालन करणं बंधनकारक आहे. एक्सलेटरवर एक पायरी सोडून उभं राहावं.

- मॉल्समधील गेमिंग सेक्शन, चित्रपटगृह बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट आणि खाद्य पदार्थांचे कॉर्नर असल्यास केवळ 50 टक्के नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून बसतील अशी व्यवस्था करावी.

ऑफिससाठी नियमावली

-कंटेनमेंट झोनमधील कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास बंदी आहे. अशा ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना work from home द्यावं.

- ज्या गेस्ट किंवा गेस्टना ऑफिसमध्ये भेटायचं आहे त्यांना अत्यावश्यक असल्यास संपूर्ण तपासणीनंतर भेटण्याची परवानगी मिळणार आहे.

- मिटिंग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाव्यात. ऑफिसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं नियम पाळणं अनिवार्य आहे.

रेस्टॉरंटसाठी नियमावली

खाण्याची डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाने हातात पार्सल देण्याऐवजी दरवाज्यावर किंवा टेबलवर ठेवावं

बसण्याची क्षमता 50 टक्केच असावी. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे.

ग्राहक रेस्टॉरंटमधून गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी बसला आहे ती जागा सॅनिटाइझ करणं बंधनकारक आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार