सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम

देशभरातील लॉकडाउनचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने पुढील टप्प्याची घोषणा केली. मात्र, यात सरकारी कार्यालयांसह हळूहळू नियम व अटींसह सर्व उद्योग व्यवसाय सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान, करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्रानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या

Aishwarya Dubey
  • May 31 2020 1:13PM

देशभरातील लॉकडाउनचा चौथा टप्पा पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने पुढील टप्प्याची घोषणा केली. मात्र, यात सरकारी कार्यालयांसह हळूहळू नियम व अटींसह सर्व उद्योग व्यवसाय सुरु करण्यात येणार आहेत. दरम्यान, करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्रानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून राज्यांना त्याचे पालन करण्यास सांगितले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य शासनाने आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्या जाहीर केल्या आहेत.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं काढलेल्या अधिकृत परिपत्रकाद्वारे चार टप्प्यात या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये १) सरकारी कार्यालये सुरु करण्यापूर्वी त्यांमध्ये काय आवश्यक बदल करण्यात यावेत याबाबत सर्वसाधारण सूचना, २) या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना, ३ एखाद्या सरकारी कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यास काय करायचं याबाबतच्या सूचना आणि ४) कार्यालयाच्या निर्जंतुकीकरण करतानाचा कुठली खबरदारी बाळगायची याबाबत भाष्य करण्यात आलं आहे.

सूचनांची सविस्तर माहिती…

1) सर्वसाधारण सूचना –

  • कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची दररोज थर्मल स्क्रिनिंग करणे
  • हवा खेळती राहण्यासाठी कार्यालयातील सर्व खिडक्या उघड्या ठेवणे
  • सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी मास्क संपूर्ण कार्यालयीन वेळेत वापरावा
  • कर्मचाऱ्यांनी जंतुसंसर्ग टाळण्यासाठी नाकाला, डोळ्यांना आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळावे
  • सर्दी-खोकला झाल्यास किंवा शिंकताना-खोकताना स्वच्छ रुमालाचा वापर करावा, टिश्यू वापरल्यास तो तत्काळ बंद कचऱ्याच्या डब्यात टाकावा
  • दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान ३ फुटांचे अंतर असावं, गरज पडल्यास बैठक व्यवस्था बदलावी
  • कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क अनिवार्य
  • कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हँडवॉशची व्यवस्था करावी
  • वारंवार वापरात येणाऱ्या वस्तू जसे लिफ्टचे बटन, बेल, टेबल-खुर्च्या व कार्यालयातील इयर उपकरणं दिवसातून तीन वेळा २ टक्के सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनने स्वच्छ पुसून घेणे
  • सर्व कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पुसून घेणे, ७० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने याचं निर्जंतुकीकरण कराव
  • कार्यालये नियमितपणे धुवून घ्यावीत, त्यासाठी सफाई कामगारांनी ग्लोव्ह्ज, रबर बूट, ट्रिपल लेअरचा मास्क वापरावा, वापरानांतर या वस्तूंची बायोमेडिकल वेस्टच्या नियमांनुसार विल्हेवाट लावावी
  • या सर्व मार्गदर्शक सूचना दर्शनिय ठिकाणी लावाव्यात

2) कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना :

  • एकाच वाहनातून अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रवास करु नये
  • ई-ऑफिसचा जास्तीत जास्त वापर करावा, फाईल्स ई-मेलद्वारे पाठवाव्यात
  • बाहेरील कमीत कमी लोकांना कार्यालयात प्रवेश द्यावा, या सर्वांची थर्मल स्क्रिनिंग करावी
  • कार्यालयीन बैठका प्रत्यक्ष बैठक खोलीत न घेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा. कर्मचाऱ्यांनी कर्यालयात एकत्र बसणे, एकत्र डबा खाणे तसेच एकाच ठिकाणी जमा होणं टाळावं, त्यासाठी आदेश काढावेत.
  • एकच काम अनेक व्यक्तींना करणे आवश्यक असल्यास २-३ लोकांचा गट करणे, कारण जंतुसंसर्ग झाल्यास फक्त त्यांच गटाचे अलगिकरण होईल

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार