सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भिवंडीत स्टील वेल्डिंग कारखान्यात भिषण स्फोट

ईजी स्टील वेल्डिंग कारखान्यात कामगार काम करत असताना सिलेंडरचा स्फोट

Abhimanyu
  • Dec 10 2020 1:36PM

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पारसनाथ कॉम्प्लेक्स येथे स्टील वेल्डिंग कारखान्यात सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमींना मानकोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी अग्णिशामक दल आणि पोलीस दाखल झाले आहेत.



सविस्तर माहिती अशी की पारसनाथ कॉम्प्लेक्स परिसरात अनेक छोटे-मोठे कारखाने अवैधरित्या सुरू आहेत. त्यापकी ईजी स्टील वेल्डिंग कारखान्यात कामगार काम करत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. प्रेम अनंत भोईर (वय 22 वर्ष) व अक्षय अशोक गौतम (वय 21 वर्षे) असे या स्फोटात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

 

गंभीर जखमी झालेल्या युवकांना उपचाराकरता मानकोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार