सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डहाणू -वडोदरा सुपरफास्ट ट्रेन आजपासून सुरु.

शुक्रवार रोजी डहाणू -वडोदरा सुपरफास्ट एक्सप्रेस ला डहाणू रोड रेल्वे स्थानकातून खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी हिरवा झेंडा दाखवला

Sudarshan MH
  • Sep 4 2021 12:08PM
 डहाणू - शुक्रवार रोजी डहाणू -वडोदरा सुपरफास्ट एक्सप्रेस ला डहाणू रोड रेल्वे स्थानकातून खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी हिरवा झेंडा दाखवला. पूर्वी ही गाडी भिलाड  वडोदरा स्थानका दरम्यान धावत होती. ती डहाणूपर्यंत वाढविण्यात आल्याने सीमा भागातील नागरिकांना त्याचा  फायदा होणार आहे.
 डहाणू वडोदरा सुपरफास्ट ट्रेन ही गाडी रोज दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी डहाणू रोड रेल्वे स्थानकातून प्रवासाला सुरुवात करेल. त्यानंतर उंबरगाव, संजाण, भिलाड, वापी आणि बलसाड आदी स्थानकादरम्यान थांबून रात्री 8 वाजून 40 मिनिटाच्या सुमारास वडोदरा स्थानकात पोहचणार आहे. तर वडोदरा येथून सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटून, 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास डहाणू रोड रेल्वेस्थानाकात येईल.
 नवीन ट्रेन मुले गुजरात औद्योगिक विकास वसाहतीत जाणारे कामगार, वैद्यकीय उपचाराला जाणारे नागरीक तसेच शेतमाल निर्यात व पर्यटन व्यवसायाला यामुळे उभारी मिळेल असा विश्वास यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून ही ट्रेन डहाणू पासून सुरु करण्यात यावी अशी मागणी होती.पालघर लोकसभा खासदार श्री.राजेंद्र गावित, पालघरचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा तसेच उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशन यासाठी पाठपुरावा केला होता.
आज डहाणू स्थानकादरम्यान झालेल्या समारंभात नगरसेवक जगदीश राजपूत. निमिल गोहिल. रमेश काकड. संजय पाटील. विक्रम नायक. अनिल शाह,उंबरगाव इंडस्ट्रियल असोसिएशन चे अध्यक्ष भगवान भरवाड, उंबरगाव चे माजी आमदार शंकर सिंह वारली. डहाणू स्टेशन प्रबंधक राघव खरा. आदी. मान्यवर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार