सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Tiktokवर झालेल्या प्रेमानं केला घात, लग्नाची स्वप्न दाखवून आयुष्यभराची दिली वेदना

हैदराबादमध्ये टिकटॉकवर ओळख झालेल्या एका मुलीला लग्नाचं वचन देऊन नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Aishwarya Dubey
  • May 18 2020 10:26AM

हैदराबाद, 18 मे : सध्या टिकटॉक (Tiktok) हे अॅप प्रत्येकाच्या फोनमध्ये असते. या अॅपमध्ये गाणी टाकून व्हिडीओ तयार केले जातात, सोशल मीडियावर या व्हिडीओची बरीच चर्चा असते. दरम्यान एकीकडे मनोरंजनासाठी या अॅपचा वापर केला जात असताना मात्र टिकटॉकमुळं एक भयंकर प्रकार घडला, यामुळं संपूर्ण हैदराबाद हादरून गेलं. हैदराबादमध्ये टिकटॉकवर ओळख झालेल्या एका मुलीला लग्नाचं वचन देऊन नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय तरुणी आणि 34 वर्षीय अकबर शाह यांची ओळख टिकटॉकवर झाली. त्यानंतर ते फोनवर एकमेकांशी बोलू लागले. पोलिसांनी सांगितले की, अकबरनं तरुणीला तो तिच्यावर प्रेम करत असून, लग्न करणार असल्याचेही सांगितले. लग्नाची बोलणी करण्याचे कारण देऊन अकबरनं तरुणीला आपल्या बहिणीच्या घरी तोलीचौकी येथे बोलवले. तिथं या तरुणीवर अकबरनं बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, अकबरनं त्याच्या घरच्यांसमोर तरुणीसोबत खोटा साखरपूडाही केला. त्यानंतर पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पोलिसांनी अकबरला अटक केली असून, त्याच्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहे. मुख्य म्हणजे अकबार शाह याचे लग्न करून त्याला 4 मुलंही आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार