सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जम्मू काश्मीर : तीन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 29 2020 8:57AM

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. अनंतनाग जिल्ह्यात ही चकमक सुरु होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, सोमवारी सकाळी अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकीला सुरुवात झाली. यामध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा जवानांची टीम परिसरात सर्च ऑपरेशन करत होती अशी माहिती देण्यात आली आहे.

 

दरम्यान दक्षिण काश्मीरमध्ये २९ विदेशी दहशतवादी कार्यरत असल्याचं जम्मू- काश्मीर पोलिसांनी शनिवारी सांगितलं. मात्र, त्यांचा सामना करण्याचा आणि या संपूर्ण भागातून दहशतवाद निपटून काढण्याचा सुरक्षा दलांना पुरेसा अनुभव आहे, हेही त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.

‘कोकेरनाग, त्राल आणि ख्रीव यांच्या वरच्या भागात विदेशी दहशतवादी आहेत. दक्षिण काश्मिरात सुमारे २९ विदेशी दहशतवादी कार्यरत असून, ते खाली उतरतील आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळेल, तेव्हा आम्ही त्यांचा खात्मा करू’, असं काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं.

विदेशी दहशतवाद्यांचे आव्हान मोठे आहे की स्थानिक दहशतवाद्यांचे असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “दोन्हींचे आमच्यापुढे आव्हान आहे, मात्र आमची दले त्यांचा सामना करण्यासाठी पुरेशी अनुभवी आहेत. त्यांना तोंड देण्याचे कौशल्य गेल्या २५ वर्षांत आम्ही मिळवले आहे. नेमकी माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. ती मिळाली की आम्ही त्यांना संपवू”.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार