सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोठी बातमी; आता येतंय Green Ration Card

केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड (Green Ration Card Scheme) योजना आणली आहे.

Aishwarya Dubey
  • Oct 9 2020 10:21AM

केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड (Green Ration Card Scheme) योजना आणली आहे. या योजनेंतर्गत गरीब लोकांना एक रुपये प्रति किलोने धान्य उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर राज्य सरकारं ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, लाभापासून वंचित गोरगरिबांना फायदा मिळवून देतील. हिरयाणा, झारखंडसह अनेक राज्यांनी या दिशेने वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे.

या वर्षाच्या अखेरीस किंवा 2021 च्या सुरुवातीला अनेक राज्यांकडून ही योजना लागू करण्यात येणार आहे. झारखंड सरकार ही योजना 15 नोव्हेंबरपासून लागू करणार आहे. ग्रीन कार्डच्या माध्यमातून राज्य सरकार लाभापासून वंचित असलेल्या गरीबांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत फायदा मिळवून देतील. ग्रीन रेशन कार्ड धारकांना यासाठी नव्याने अर्ज करावा लागेल.

 

ग्रीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी सार्वजनिक सेवा केंद्र किंवा अन्न पुरवठा विभाग येथे अर्ज करावा लागेल. अर्जदार ऑनलाईन अर्जही करू शकतो. ग्रीन रेशन कार्डसाठी अर्जदारांना आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खात्याचे डिटेल्स, वोटर आयडीकार्ड अनिवार्य आहे.

एक रूपये प्रति किलो धान्य

ग्रीन रेशन कार्डअंतर्गत राज्य सरकार गरीबांना प्रति यूनिट 5 किलो धान्य देणार आहे. ही योजना देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू करण्यात येत आहे. योजनेची सर्व जबाबदारी राज्य सरकारांकडे राहील. या योजनेची अंमलबजावणी करणारे राज्याचे प्रमुख, पंचायत सेवक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था दुकानदारांशी बैठक घेत असतात. बैठकीत राज्य अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थींसाठी बनणाऱ्या ग्रीन कार्डसंबंधी चर्चा सुरू आहे

बीपीएल कार्यधारकांनीही ग्रीन रेशन कार्ड मिळेल. मात्र यावेळी बीपीएल कार्डधारक किती गरीब आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे, याची तपासणीही करण्यात येईल. ही योजना केंद्र सरकारद्वारे तयार करण्यात आली असून, लागू आणि सुरू करण्याचं काम राज्य सरकारद्वारा होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार