सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तांत्रिक बिघाड असतांना‌ अग्रवालने मुलाच्या ताब्यात कार दिल्याचे उघडकीस; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अग्रवालसह तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Shruti Patil
  • May 23 2024 9:54AM

पुणे: ‘बाळा’ने कार चालवायला मागितली, तर चालवायला दे, तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालनेच दिली होती. अग्रवालकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरची पोलिसांनी चौकशी केली. चालकाने दिलेल्या जबाबातून ही माहिती उघड झाली आहे. तसेच अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असतांना अग्रवालने मुलाच्या ताब्यात कार दिल्याचे उघडकीस आले आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अग्रवालसह तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघातानंतर कारचालक ‘बाळा’विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य उपलब्ध करून देणे तसेच त्याला कार दिल्याप्रकरणी अल्पवयीन बाळाचा बाप विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली. ‘बाळा’ने ज्या पबमध्ये मद्यप्राशन केले होते, तेथील दोघांना अटक केली. त्यानंतर विशाल अग्रवाल (५०), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (३४, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) आणि जयेश सतीश गावकर (२३, रा. केशवनगर, मुंढवा) यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार