सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या तब्येतीची धनंजय मुंडे यांच्याकडून विचारपूस

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असून ते सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत आहेत.

Shruti Patil
  • May 24 2024 10:27AM
पुणे (दि. २३): श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असून ते सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज महाराजांशी व रुग्णालयातील डॉक्टरांशी दूरध्वनीवरून चर्चा करून महाराजांच्या तब्येतीची विचारपूस केली. 
 
मुंडे कुटुंबीयांच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते अजय मुंडे यांनी ह भ प विठ्ठल महाराज यांची पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे भेट घेऊन त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती घेतली. महाराजांच्या एका पायाला दुखापत झाली असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, अशी माहिती अजय मुंडे यांना डॉक्टरांनी दिली. 
 
दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील यावेळी महाराजांशी दूरध्वनीवरून चर्चा करत महाराजांच्या तब्येतीची तसेच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली व विठ्ठल महाराजांना लवकर आराम मिळावा अशी सदिच्छा व्यक्त केली. धनंजय मुंडे व त्यांची यंत्रणा विठ्ठल महाराज शास्त्री यांचा अपघात झाल्यापासून महाराजांच्या संपर्कात असून त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार केले जात आहेत, तसेच त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार