पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहेत. मे २०२४ अखेर सदरचे काम पूर्ण करून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्वत करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह.अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली.
आज दि. ४ मे रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी पुरातत्त्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या समवेत गाभाऱ्याची पाहणी करण्यात आली.