सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे महानगरपालिकेचा अनधिकृत हॉटेल्स, पब्ज व रेस्टॉरंटवर कारवाईचा धडाका सुरू; ५४ हजार ३०० चौ. फूटांचे अतिक्रमण जमीनदोस्त

कल्याणीनगर येथील दुर्घटनेनंतर आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित हॉटेल आणि पबच्या बांधकामाचे सर्वेक्षण सुरु केले आहे.

Shruti Patil
  • May 24 2024 10:17AM

पुणे: कल्याणीनगर येथील दुर्घटनेनंतर आता महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित हॉटेल आणि पबच्या बांधकामाचे सर्वेक्षण सुरु केले आहे. ज्या ठिकाणी मंजुर नकाशापेक्षा अनधिकृत बांधकाम केले गेले आहे. अशा ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. बेकायदेशीरपणे चालविल्या जाणार्‍या रुफटॉप आणि साईड मार्जिन मधील रेस्टॉरंट, बार आणि पबच्या विरोधात महापालिकेच्या बांधकाम विभागाने हातोडा चालविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत मुंढवा, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर घोरपडी, पुणे स्टेशन आणि विमाननगर परिसरात स्वतंत्र पथके तयार करून मुंढवा भागातील हॉटेल, पब आदींचे अनधिकृत शेड काढण्यात आल्या आहेत.

तब्बल ४० ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ५४ हजार ३०० चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. यापैकी अनेक हॉटेल्स व पब्जवर पुर्वीही कारवाई करण्यात आली होती. यानंतरही पुन्हा अनधिकृत शेडस् उभारल्याने कारवाई केली असून लवकरच संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार