मध्यप्रदेश: मध्यप्रदेश मधील इंदूर शहरातील खजराना पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी ७ जणांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. यानंतर यांच्यापैकी एक असलेल्या हरिनारायण (आधीचा हैदर) या तरुणाच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. यात त्याच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच हरिनारायण याला ठार मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. अशा परिस्थितीत घाबरलेल्या हरिनारायण याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संरक्षणाची मागणी केली आहे.
या तक्रारीविषयी पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संपर्क प्रमुख संतोष शर्मा यांनी सांगितले की, या धमकीबद्दल सांगायचे, तर ही धमकी महाराष्ट्रातील एका इस्लामी संघटनेने दिली आहे. तेथून धमकीचे पत्र देण्यात आले आहे. यामध्ये हरिनारायणला ‘काफिर’ म्हटले आहे. आम्ही आमचे काम करत आहोत आणि करत राहू. हिंदु धर्मात आणण्याचे काम चालू राहील. धमकी देणार्या संघटनांवर बंदी घातली पाहिजे.