सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धक्कादायक! मुंबईत सेलिब्रिटींची चिंता वाढली, केअरटेकरच निघाला कोरोना पॉझिटिव्ह

अंधेरी (वेस्ट) लिंक रोडवरील म्युझिक कंपनी आणि फिल्म प्रॉडक्शन टी-सीरीजचं (T-Series) ऑफिस असलेली बिल्डिंग सील करण्यात आली आहे.

Aishwarya Dubey
  • May 11 2020 11:03AM

मुंबई, 11 मे: अंधेरी (वेस्ट) लिंक रोडवरील म्युझिक कंपनी आणि फिल्म प्रॉडक्शन टी-सीरीजचं (T-Series) ऑफिस असलेली बिल्डिंग सील करण्यात आली आहे. टी सीरीज बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या एका केअरटेकरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

या पार्श्वभूमीवर टी-सीरीजच्या बिल्डिंगसह आजुबाजुचा परिसर सील करण्यात आला आहे. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ग्राउंड स्टाफमधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. नंतर बीएमसीने संपूर्ण बिल्डिंगसह परिसर सील केला आहे. या परिसरात अनेक सेलिब्रिटींचे फ्लॅट आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

टी-सीरीजच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, अंधेरी येथील ऑफिस परिसरात राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी कोरोनाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण बिल्डिंग सील करण्यात आली आहे.

या परिसरात काही परप्रांतीय मजूर राहतात. लॉकडाऊनमुळे त्यांना स्वगृही जाता आलं नाही. त्यामुळे कार्यालय परिसरात त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

बिल्डिंगमधील इतरांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांचा रिपोर्ट आलेला नाही. खबरदारी म्हणून बीएमसीने ऑफिसची बिल्डिंग सील केली आहे. दरम्यान, टी सीरीज ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी 15 मार्चपासून बंद होते. कर्मचारी वर्क फॉर्म होम करत आहेत.

टी सीरीज बिल्डिंगसमोरील एक बिल्डिंग गेल्या महिन्यात बीएमसीने सील केली होती. या बिल्डिंगच्या एका विंगमध्ये 11 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. या दोन्ही बिल्डिंग्ज एकमेकांच्या समोर आहेत.

टी सीरीजच्या समोरील बिल्डिंगमध्ये विकी कौशल, राज कुमार राव, चित्रांगदा सिंह, चाहत खन्ना, अहमद खान, सपना मुखर्जी, राजकुमार राव-पत्रलेखा, राहुल देव, मुग्धा गोडसे, कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, नील नितिन मुकेश, आनंद एल. राय, अर्जन बाजवा, विपुल शाह आणि प्रभुदेवा या सेलिब्रिटींचे फ्लॅट आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार