सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विहिंप ज्येष्ठ पूर्ण वेळ कार्यकर्ते भुजंगराव घुगे यांना विहिंप पिंपरी चिंचवड जिल्हावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पूर्णवेळ कार्यकर्ते

Sudarshan MH
  • Oct 27 2020 10:32AM
 विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ पूर्णवेळ कार्यकर्ते भुजंगराव वामन घुगे अणदूरचे राहणारे गेले ३८ वर्ष न थकता न थांबता अखंड आणि प्रकृतीचा व मनाचा न विचार करता अखंडपणे सेवा करणारे भुजंगराव (वय ६२) यांचे लखनऊ येथील रविवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कोरोना आजाराने निधन झाले. आज ते आमच्यात राहिले नाहीत, मूळ धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावचे कार्यकर्ते, अणदूर छोटं गाव, शेतकरी कुटुंबातला पदवी पर्यंत शिक्षण झालेले १९८२ पासून विश्व हिंदू परिषद पूर्णवेळ म्हणून बाहेर पडले, विश्व हिंदू परिषदेचा एकत्र प्रांत होता त्यावेळी पुण्यातून एक जाहिरात दिली होती. विश्व हिंदू परिषदेच्या पूर्णवेळ ज्यांना जायचं आहे त्यांनी आपली नावे नोंद करावीत त्यात तिघे जणांची नावे, त्यातले ही भुजंगराव घुगे, भुजंगराव विश्व हिंदू परिषदेच्या कामाला १९८२ साली कोल्हापूर जिल्हा संघटन मंत्री, सोलापूर विभाग संघटनमंत्री, एकत्र प्रांत असताना सह प्रांत मंत्री, एकत्र प्रांत संघटन मंत्री आणि प्रांताची स्वतंत्र रचना झाल्यानंतर देवगिरी प्रांताचे संघटनमंत्री २००३ ते २००७ संघटनमंत्री, २००७ नंतर सहा वर्ष मुंबई क्षेत्राचे धर्मप्रसाराचे पदाधिकारी, २०१४  ते १९ कर्नाटक क्षेत्राचे आणि २०२० फेब्रुवारी पासून श्रीराम मंदिराच्या निर्माणाचे काम आयोध्या चालू झाले, त्या निर्माणाच्या रचनेत त्यांची नियुक्ती झाली. भुजंगरावांच्या आत्ता परिवारत चौघे भाऊ आणि तीन बहिणी पैकी एक भाऊ एक महिन्यापूर्वी कोरोना मुळेच गेले. भावांची चार मुल असा भुजंगराव यांचा परिवार आहे. भुजंगराव ३८ वर्षे पूर्ण वेळ काम केले, त्याकाळात अणदूरयेथे व आजूबाजूच्या बारा गावातून चौसष्ठ पूर्णवेळ कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद आणि अनेक कार्यालयात विद्यार्थी कार्यकर्ते अणदूर गावातील असंख्य चालक असा त्यांचा फार मोठा वाट आहे. भुजंगराव तसं म्हणलं तर ते व त्यांचे कार्यालय त्यांचा संसार आणि त्यांचे सर्वस्व बरोबर घेऊन प्रवास करत असत.
        
           स्वर्गीय भुजंगराव घुगे यांना पिंपरी चिंचवड जिल्हा वतीने आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विहिंप मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊरावजी कुदळे, विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विजयराव देशपांडे, प्रांत महिला विभाग पालक, नंदकुमार कुलकर्णी, विहिप जिल्हाध्यक्ष शरदराव इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, मुकुंद चव्हाण, महादेव साळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भुजंगराव घुगे यांच्या जाण्याने विश्व हिंदू परिषदेचे व संघाचे कधीही न भरून निघणार नाही असे खूप मोठे हानी झाली आहे. मन मिळावू, सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघ परिवाराचे कार्य तेवत ठेवणारे यांच्या जाण्याने समस्त घुगे परिवार व विश्व हिंदू परिषदेवर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याचे बळ मिळो व भुजंगराव घुगे यांनी ईश्वर चरणी सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना अशी प्रार्थना विहिंप मुम्बई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊरावजी कुदळे व पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री, विजयराव देशपांडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना केली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार