सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बेलवड़े ग्रामपंच्यात चा लाखो रुपये मोबाईल टॉवर कर थकित - प्रमोद तिवारी - महाराष्ट्र

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रातील मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कर आकारण्याचे निर्देश नगरविकास विभागाने या अगोदर देऊन ही बेलवड़े खुर्द ग्रामपंच्यात कमेटी व ग्रामसवेक कडून मोबाईल टॉवर चा थकीत लाखो रुपये कर वसूल करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

Manish Gupta
  • May 18 2020 12:53PM

सातारा :- नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रातील मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कर आकारण्याचे निर्देश नगरविकास विभागाने या अगोदर देऊन ही बेलवड़े खुर्द ग्रामपंच्यात कमेटी व ग्रामसवेक कडून मोबाईल टॉवर चा थकीत लाखो रुपये कर वसूल करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

मोबाईल टॉवरची मालमत्ता कराच्या अखत्यारित येत आसून ,नगरपालिका, महानगर पालिका नगरपरिषद,ग्रामपंच्यात,यांना नगरविकास प्रशासनाने मोबाईल टॉवर   मालमत्ता कर आकारण्याचे आदेश  देण्यात आले आहेत परंतु बेलवड़े  गावातील साधारण 2013 ते 2017 च्या काळातील ग्रामपंच्यात वर्ती शिवसेना पक्षाची सत्ता होती व आता 2018 पासून ग्रामपंच्यात वर्ती राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे या दोनी पक्षाच्या सत्ता असताना ग्रामपंच्यात च्या कारकीर्दी मध्ये कोणत्याही,सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंच्यात सदस्या कडून व ग्रामपंच्यातच्या ग्रामसेवक कडून आता पर्यंत बेलवड़े खुर्द ग्रामपंच्यात च्या हद्दिमधील उभा आसलेला अनाधिकृत मोबाइल टॉवर चा लाखो रुपये थकित कर वसूल करता आला नसल्याचे धक्कादायक समोर आले आहे थकित कर वसूल करत नसल्या बाबत ग्रामस्थांनच्या मना मध्ये रोष  आहे 
बेलवड़े गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनेचे विद्युत बिल सुमारे दीड लाखाच्या आस पास आल्याने अगोदरच गावातील जनतेला 
ग्रामपंच्यात कडून असुविधाचा पाड़ा सुरु असताना आता विद्युत बिलाचे देयक भरण्यासाठी पैसे नसल्याने ऐंन गर्मिच्या काळात पिण्याच्या पाण्या मध्ये ग्रामपंच्यात कडून कपात करण्यात आली आहे 
एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉक डाऊन झाल्याच्या तारखे पासून पुढील तीन ते चार महीने जनतेच्या वापरातील विद्युत पुरवठा शाशकीय अथवा सरकारच्या देखरेखी खाली व अत्यावश्यक आसलेल्या कोणत्याही विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला जाणार नसल्याचे जाहिर करून ही बेलवड़े खुर्द ग्रामपंच्यात गावातील जनेतची दिशाभूल करत आहे ?
एकीकडे ग्रामपंच्यात हद्दिमधील आसलेल्या अनाधिकृत मोबाइल टॉवर चे लाखो रुपये थकीत बिल राजकीय दबावा पोटी वसूल करण्याचे धाडस  ग्रामपंच्यात कमेटी मध्ये नसल्याचे दिसून येत आहे 
एकीकडे कोरोना मुळे लॉक डाऊन सुरु आसल्याने सर्व उद्योगों धंदे बंद पडले आहेत त्यामुळे बेरोजगार झालेले कामगार मुंबई पुणे व इतर शहरातून आपल्या मुळगावी परतले आहेत आगोदरच गरीब जनतेचे आर्थिक नुसकान होहुन कंबरडे मोडले आहे त्यातच बेलवड़े ग्रामपंच्यात गावातील गरीब जनेतची घरपट्टी व इतर कर वसूल करण्याच्या नावाने पिण्याच्या पाण्या मध्ये कपात करून जनतेवर अन्याय करत असल्याचा गंभीर आरोप  ग्रामस्थानच्या कडून केला जात आहे.

 मोबाईल टॉवर मालमत्ता कराच्या अखत्यारित असून त्या मा. सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबर 2016 रोजी निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयात विविध रीट याचिकांमध्ये मोबाईल टॉवर्सवर मालमत्ता कर आकारण्याबाबत दिलेल्या निर्णयाच्याविरुद्ध दाखल अपिल विचारात घेण्यात आल्या. त्यावर १६ डिसेंबर २०१६ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील परिच्छेद ३०, ३१, ३२ व ३३ मध्ये मोबाईल टॉवर्स ही मालमत्ता असल्याने संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांचेकडून मालमत्ता कर वसूल करता येतो, असे नमूद आहे. त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार