सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रयत क्रांती संघटनेकडून दुध बंद आंदोलन झाले

दूधगाड्या अडवून गरिबांना दूध वाटप

Aishwarya Dubey
  • Aug 1 2020 10:26AM

दूध दरवाढीच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी राज्यात विविध ठिकाणी रयत क्रांती संघटनेकडून दुध बंद  आंदोलन झाले. राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन अंतर्गत  इस्लामपूर( जि. सांगली) शहरात दूधगाड्या अडवून गरीबांना संघटनेचे सागर सदाभाऊ खोत, आबा भांभुरे, स्वप्नील सुर्यवंशी आदींनी दूध वाटले.

महायुतीचे नेते व रयतचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत हे सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या विठुरायाच्या चरणी दुधाचा अभिषेक घालण्यात आला. ‘राज्य सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला १० रुपये अनुदान द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो ५० रुपये निर्यात अनुदान देण्याची सुबुद्धी दे बा…विठ्ठला’ असे पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार