सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंत्रालयाचं मुख्यालय असलेली ‘श्रम शक्ती’ ही इमारत पूर्ण सॅनिटाइज करण्यात येणार

मंत्रालयाचं मुख्यालय असलेली ‘श्रम शक्ती’ ही इमारत पूर्ण सॅनिटाइज करण्यात येणार आहे. तर त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे.

Aishwarya Dubey
  • May 11 2020 10:57AM

नवी दिल्ली 10 मे: राजधानी दिल्लीतल्या ऊर्जा मंत्रालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. मंत्रालयातला एक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने आज खळबळ उडाली. हा कर्मचारा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसत होता. त्यामुळे इमारत तत्काळ बंद करण्यात आली आहे. आता ऊर्जा मंत्रालयाचं मुख्यालय असलेली ‘श्रम शक्ती’ ही इमारत पूर्ण सॅनिटाइज करण्यात येणार आहे. हा कर्मचारी कुणा कुणाच्या संपर्कात आला याचीही माहिती काढली जात असून त्यांना घरातच क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

देशातला लॉकडाऊन संपायला आता केवळ 7 दिवस रहिले आहेत. देशातला लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्यात आला होता. तो लॉकडाऊन 17 मेला संपणार असून त्यानंतर काय होणार हा प्रश्न देशभर विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (11 मे) देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. पंतप्रधानांची कोरोना प्रकरणा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतची ही 5वी व्हिडीओ कॉन्फरन्स आहे. त्यात कुठला निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, महत्त्वाच्या विभागांचे केंद्रीय सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता ही व्हिसी होणार आहे.

लॉकडाऊनमुळे देशातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. लाखो मजुरांचं काम बंद झाल्याने त्यांच्या उपजि विकेचा प्रश्न निर्माण झालाय. अजुनही हजारो मजूर रस्त्याने चालत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्व प्रश्नांवर चर्चा या बैठकीत होणार असून 17 मेनंतरचा रोडमॅप तयार केला जाणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार