सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठी माणूस तुमच्या छाताडावर उभा राहील - संजय राऊत

"महाराष्ट्रात व्यापार करणं दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल"

Aishwarya Dubey
  • Nov 25 2020 10:53AM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. सगळी चौकशी झाल्यानंतर १२० नेत्यांची यादी आपण पाठवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

फडणवीसांनी काही चुकीचं केलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “कोणी चौकशीला घाबरत नाही. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे विसरु नका. तेव्हा चौकशांना कोण घाबरत आहे लवकरच कळेल”.

संजय राऊत यांना यावेळी तुम्हालाही नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा असल्याचं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मला अनेकांनी विचारलं. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला…नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु आहे असं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत”.

“देशात इतर काही काम नसेल. घोटाळा करुन लोक देशाबाहेर पळत आहेत. एका वर्षात लोकांची संपत्ती वाढत आहेत्यांची ईडी चौकशी करणार नाही. पण महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मला नोटीस देण्याबद्दल कोणी बोलत असेल तर येऊ देत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

“या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी यावेळी अहमद पटेल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. “गुजरातचं राजकारण त्यांच्या नजर आणि इशाऱ्यावर चालत होतं. आजही गुजरातच्या राजकारणावर त्यांची तेवढीच पकड होती. अहमद पटेल यांचा राज्यसभेत पराभव करणं शक्य झालं नाही. काँग्रेसला आज त्यांची सर्वात जास्त गरज होती. अहमद पटेल यांना मुंबईत आणून उपचार करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. अहमद पटेल यांच्यासारखा विनम्र नेता आपण कधीच पाहिला नाही,” असं ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार