सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला

स्थानिक ग्रामपंचायतीची या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला परवानगी असतानाही तो सरकारनं हटवला

Aishwarya Dubey
  • Aug 8 2020 3:44PM

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाब आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा कुठे पोलिसांचा दबाब कमी झाला होता. मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीनं शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यात आला आहे. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेली माहिती अशी की,  बेळगाव जिल्ह्यातील मनगुती या गावात ग्रामपंचायतीच्या ठरावानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता. मात्र, शुक्रवारी अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनानं रातोरात हा पुतळा हटवला. गावातील दुसऱ्या गटातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर हा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळं या भागात तणावाच वातावरण निर्माण झालं.

विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनं करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर मनगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात जाब विचारण्यासाठी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता त्याठिकाणी गर्दी केली. दरम्यान कर्नाटक सरकारनं शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा त्वरित उभा करावा, अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, अशा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

'संजय राऊत हे रावणासारखे राक्षस'

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या जानेवारी महिन्यात बेळगाव दौऱ्याला गेले होते. संयज राऊत यांच्या या दौऱ्याला कर्नाटक नवनिर्माण सेनेनं जोरदार विरोध केला होता. 'संजय राऊत हे कोणत्याही परिस्थितीमध्ये बेळगावमध्ये येऊ नयेत. कर्नाटक सरकार आणि बेळगाव प्रशासन कसं यांना परवानगी देते?' असा सवाल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर यांनी केला होता.

 

https://twitter.com/i/status/1292011203011600385

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार