सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय? - आशिष शेलार

काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय

Sudarshan MH
  • Feb 6 2021 1:04PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय?, असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा टोलाही त्यांनी लगावला.

शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशी सेलिब्रेटिंच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने ‘पॉप डान्स’ केला. तर या परदेशी सेलिब्रेटिंना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्याविरोधात धिंगाणा घातला.”

 


“वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्रभूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर ‘ट्रॅक्टर’ फिरवणार का? असे अनेक प्रश्नही शेलार यांनी शिवसेनेला विचारले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार