सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर बंदुकीचा धाक दाखवत शिवसैनिकाने केला ओव्हरटेक

गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्याने आमदाराची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

Sudarshan MH
  • Jan 30 2021 12:38PM

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओमुळे सोशल नेटवर्किंगवर एकच खळबळ उडली आहे. हा व्हिडीओ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील (एक्सप्रेस-वे वरील)असल्याचा दावा जलीली यांनी केलाय. व्हिडीओमध्ये रात्रीच्यावेळी वाहतुककोंडीमध्ये एक कारचालक बंदुकीचा धाक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीच्या मागील बाजूस शिवसेनेची ओळख असणाऱ्या महाराष्ट्राच्या भगव्या रंगाच्या नकाशावरील वाघ असं चिन्ह दिसत आहे. याच कारणामुळे जलील यांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केलीय.

“हे (दुष्य) महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आहे. वाहनवरील लोगो सर्व काही सांगत आहे. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का?”,असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांच्या डीजीपींनाही टॅग केलं आहे.

या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.

हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून जलील यांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या चालकाला अटक करावी अशी मागणी अनेकांनी केलीय. हा महाराष्ट्र आहे युपी-बिहार नाही असं म्हणत एकाने संबंधित चालकावर कारवाई करावी असं म्हटलं आहे. अनेकांनी गाडीचा क्रमांक या व्हिडीओत स्पष्ट दिसत असल्याने चालकाला शोधण्यास काही अडचण येणार नाही असंही नमूद केलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार