सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार - संजय राऊत

'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल

Sudarshan MH
  • Nov 30 2020 1:20PM

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे, कदाचित उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल', अशी घोषणाच केली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी ऊर्मिला मातोंडकर या सेनेत प्रवेश करणार आहे का? असं विचारलं असता राऊत म्हणाले की, 'ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच आहे. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. ही शिवसेनेसाठी चांगलीच गोष्ट आहे. त्यांच्या प्रवेशामुळे महिला आघाडी मजबूत होईल'.

ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी ऊर्मिला यांचा दारूण पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे ऊर्मिला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऊर्मिला या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन ऊर्मिला मातोंडकरशी चर्चा केल्यानं त्यांनी विधान परिषदेसाठी होकार दिला होता

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार