सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चरस आणि एमडी ड्रग्सचा साठा जप्त

पंचवटी चौकात चरस आणि एमडी (मॅफो ड्रोन) ड्रग्सचा साठा जप्त

Aishwarya Dubey
  • Sep 29 2020 4:08PM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अंमलीविरोधी पथकाकडून (NCB) चौकशीचं सत्र सुरूच आहे. या चौकशीमुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची झोप उडाली आहे. त्यात औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील पंचवटी चौकात चरस आणि एमडी (मॅफो ड्रोन) ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एमडी ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी पंचवटी चौकातून जप्त केले आहे. ड्रग्स साठा शहरात विक्रीसाठी आणण्यात आला असावा, असा संशय पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी स्कॉर्पिओ वाहनातून अंमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी पंचवटी चौकात सापळा रचून ती चारचाकी वाहन थांबवलं. त्या गाडीची झडती घेतली असता त्यात एमडी नावाच्या ड्रग्सच्या 13 पुड्या व चरस या अंमली पदार्थाच्या 25 पुड्या आढळून आल्या. ळ्या बाजारात या ड्रग्स किंमत एक कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपी सहित एक वाहन पोलिसांनी जप्त केली आहे. वेदांत नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक  रामेश्वर रोडगे यांनी दिली आहे.

ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची उडणार झोप...

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अंमलीविरोधी पथकाकडून (NCB) चौकशीचे सत्र सुरूच आहे. या प्रकरणी आता NCB च्या ताब्यात तब्बल 45 फोन हाती लागले आहे. या फोनमध्ये अनेक सेलिब्रिटींची नाव असल्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना ड्रग्स घेत असल्याचा खुलासा झाला. त्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर अंमली विरोधी पथकाने बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी करण्यात आली आहे.

अंमली विरोधी पथकाने आतापर्यंत 45 फोन ताब्यात घेतले आहे. या फोनची तपासणी सध्या सुरू आहे. या फोन्समुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांची मोठी यादी समोर येण्याची शक्यता आहे. 45 फोनपैकी 15 मोबाइल फोनची तपासणी पूर्ण झाली असून त्याचा रिपोर्ट हा NCB ला मिळाला आहे. या आधारे आता NCB तपास करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार