सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना लस ठरली 100% प्रभावी

गंभीर कोरोना प्रकरणांमध्ये ही लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे

Sudarshan MH
  • Dec 15 2020 12:50PM

आतापर्यंत काही कोरोना लशींच्या ट्रायलचे अंतरिम परिणाम जारी करण्यात आले आहेत. या लशी जास्तीत जास्त 95 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. मात्र आता कोरोनाची 100 टक्के प्रभावी लसही सापडली आहे. विशेष म्हणजे या लशीचं भारतातही ट्रायल सुरू आहे. ही लस म्हणजे रशियाने तयार केलेली  Sputnik V. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील अहवाल रशियानं जारी केला आहे. जो खूपच सकारात्मक आहे.

रशियन लस Sputnik V चं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. रशियामध्ये काही जणांना लशीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस दिल्यानंतर 21 दिवसांनी त्याचा परिणाम तपासण्यात आला. त्यानुसार ही लस 91.4% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. गंभीर कोरोना प्रकरणांमध्ये ही लस 100 टक्के प्रभावी ठरली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेनं ही माहिती दिली आहे. याआधी अंतरिम अहवालात ही लस 92 टक्के परिणामकारक ठरल्याचं या देशाने सांगितलं होतं.

 

 

 

मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे. रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. या लशीला  11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार