सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Reliance समुहाचा मोठा निर्णय :कोरोना व्हॅक्सिनचा सर्व खर्च कंपनी उचलणार

रिलायन्स समुहामध्ये काम करणाऱ्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. समुहाकडून कर्मचाऱ्यांच्या कोरोना व्हॅक्सिनेशनचा सर्व खर्च उचलला जाणार आहे

Sudarshan MH
  • Mar 5 2021 10:56AM

रिलायन्स समुहामध्ये काम करणाऱ्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. समुहाकडून कर्मचाऱ्यांच्या कोरोना व्हॅक्सिनेशनचा सर्व खर्च उचलला जाणार आहे.  रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन आणि संस्थापक नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे.

नीता अंबानी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना या ईमेलद्वारे लसीकरण मोहिमेसाठी नोंदणी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी अशीही माहिती दिली की कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त त्यांची पत्नी किंवा पती, आई-वडील आणि लस घेण्यास पात्र असणारी मुलं यांच्या देखील लसीकरणाचा खर्च कंपनी करणार आहे. रिलायन्स समुहामध्ये साधारण 6 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय मिळून ही आकडेवारी 1.9 मिलियनच्या घरात जाते. या सर्वांचा कोरोना लशीचा खर्च रिलायन्स समुहाकडून करण्यात येणार आहे.

नीता अंबानी यांनी या मेलमध्ये असेही म्हटले आहे, 'याआधी रिलायन्स फॅमिली डे 2020 च्या मेसेजमध्ये, मुकेश आणि मी दोघांनीही खात्री दिली होती की COVID-19 लशीला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रिलायन्स कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लस मिळावी याकरता आम्ही खास योजना आखू. आम्ही त्या ध्येयाशी बांधिल आहोत.'

कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पुढे म्हणाल्या की, आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि आनंदाची कदर करणे म्हणजेच एखाद्या कुटुंबाचा-रिलायन्स कुटुंबाचा भाग असणे आहे.

नीता अंबानी पुढे म्हणाल्या की, 'तुमच्या पाठिंब्यामुळे, आपण लवकरच या पँडेमिकला मागे सोडू. तोपर्यंत निराश होऊ नका. अधिकाधिक सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेणे सुरू ठेवा. आपण या सामुहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एकत्र मिळून आपण विजय मिळवला पाहिजे आणि आपण जिंकू.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार