सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

BREAKING :“महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे…”; राहुल गांधींची मोदी सरकारकडे मागणी

पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी केंद्राकडे केली मागणी

Aishwarya Dubey
  • May 16 2020 3:45PM

केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे असं मत  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्रासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असल्याचे मत व्यक्त करत केंद्राने राज्याला पूर्ण पाठिंबा देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर एका पत्रकाराने करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला केंद्राने अधिक मदत करायला हवी का अशा संदर्भातील प्रश्न राहुल गांधी यांना विचारला. “महाराष्ट्र हे एक मोठं राज्य तर आहेत शिवाय ते एक अद्वितीय राज्य आहे. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राचा पूर्ण पाठींबा मिळायला हवा,” असं मत राहुल गांधी यांनी या प्रश्नाला उत्तर देताना मांडलं. “सर्वच राज्यांना केंद्र सरकारने मदत करायला हवी. कारण राज्य सरकारच्या माध्यमातूनच करोनाविरुद्धची लढाई लढणे अधिक सोयीस्कर ठरेल. राज्य सरकारने या लढाईचे नेतृत्व करु शकतात. व्यवस्थापन पाहणे हे केंद्र सरकाचे काम असून राज्य सरकारांनी प्रत्यक्षात अंमलबाजवणी करण्याचे काम केलं पाहिजे. केंद्राचं काम मॅनेज करायचं आहे तर राज्यांचं काम ऑपरेट करण्याचं,” असंही राहुल यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

“ज्यापद्धतीने केंद्र सरकारने राज्य सरकारांना पैसे दिले पाहिजेत त्यापद्धतीने निधी पुरवला जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. यासंदर्भात त्यांची विचारसरणी वेगळी असेल. केंद्रीयकरणाच्या माध्यमातून (म्हणजेच सेंट्रलायझेशनच्या माध्यमातून) या संकटाला तोंड देण्याची त्यांची योजना असेल. पण मला असं वाटतं नाही. माझ्या मते त्यांनी राज्य सरकारांच्या माध्यमातून काम करण्याची गरज आहे,” असा सल्लाही राहुल गांधी यांनी दिला.

महाराष्ट्र एक अद्वितीय राज्य आहे. महाराष्ट्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे महाराष्ट्रास केंद्र सरकारचा पूर्ण पाठींबा मिळायलाच हवा

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार