सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे

प्रतिबंधित भागात अँटिजेन टेस्ट वाढविण्यात येणार

Aishwarya Dubey
  • Sep 5 2020 7:54PM

पुण्यात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

 

पुण्यात आज करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

जावडेकर म्हणाले, पुण्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित भागात अँटिजेन टेस्ट वाढविण्यात येणार आहे. मास्क न घालणार्‍या लोकांवर आणि कुठेही थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. अशा गोष्टी टाळल्यास करोनाबाधित रुग्ण संख्येची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.

तसेच शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना सहभागी करून घेणार आहे. पण यासाठी नागरिकांचा सहभाग असणे जरुरीचे असून केंद्र सरकार पुणेकर नागरिकाच्या कायम सोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार