सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे शहराच्या कोरोनाबाबत सद्य स्थितीचा आढावा घेणार

लॉकडाउनमुळे ठप्प झालेले पुणे शहर हळूहळू पुर्वपदावर येत आहे. पण पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 26 2020 9:19AM

लॉकडाउनमुळे ठप्प झालेले पुणे शहर हळूहळू पुर्वपदावर येत आहे. पण पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे शहराच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे शहराच्या कोरोनाबाबत सद्य स्थितीचा आढावा घेणार आहे. सकाळी 10 च्या सुमारास स्मार्ट सिटी सेंटर इथं आयुक्त,अतिरिक्त आयुक्त महापौर यांच्या हजेरीत ते आढावा घेणार आहे.

त्यानंतर  विधान भवनला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या सोबत बैठक घेतील.भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता.  फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे आज शरद पवार यावर काही भाष्य करतील का हे पाहण्याचे उत्सुकतेचं ठरणार आहे

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही शरद पवार हे राज्याला लागण झालेले कोरोना आहे, अशी विखारी टीका केली होती. पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीने दोन दिवस राज्यभरात तीव्र आंदोलनं केली असून बारामतीत गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या विषयांवर शर पवार काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार