सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात कोरोनाची परिस्थिती कशी

कोरोनाच्या या महामारीत फक्त पुणे शहरच होरपळून निघालं असं नाहीतर पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचा भागही तितकाच होरपळून निघाला

Aishwarya Dubey
  • Oct 31 2020 10:55AM

पुण्यात गेली 7 महिने महामारीचं थैमान घालत असलेली कोरोनाची साथ आता कुठे आटोक्यात आली आहे. कारण, पुणे शहराचा कोरोना रिकव्हरी रेट तब्बल 94 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. पण पुणेकरांचा कोरोनाविरूद्धचा लढा प्रशासनासाठी अक्षरशः कसोटीचा अंत पाहणारा होता. तसंच गेल्या सात महिन्यात पुणेकरांनीही खूप सोसलं आहे.

कोरोना रिकव्हरीत देशात नंबर वन बनल्याबद्दल सध्या पुणेकरांवर चोहोबाजुनी कौतुकाचा वर्षाव होत असला तरी पुणेकरांसाठी ही लढाई निश्चित सोपी नव्हती. प्रशासनासाठी तर शब्दशः अंत पाहणारी होती. कारण, याच पुण्यात अगदी महिन्याभरापूर्वी कोरोना पेशंट्सना उपचारासाठी बेड्स मिळत नव्हते. कित्येक कोरोना पेशंट्स तर उपचाराविना अक्षरशः तडफडून मेलेत. त्यातही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने तर खूपच वाईट गेले. दैनंदिन रूग्णवाढ आता 300- 350 च्या खाली आली असली तरी कधी काळी याच पुण्यात दररोज तब्बल 2 हजार नवे रूग्ण आढळून येत होते. त्यामुळे या काळात प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली

जुलै महिन्याच्या शेवटी तर आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागल्याने पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन करावं लागलं होतं. अशातच गणेशात्सवाच्या काळात पुणेकर मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याने ऑगस्ट महिन्यात आटोक्यात येऊ पाहणारी कोरोनाची साथ सप्टेंबरमध्ये पुन्हा हाताबाहेर गेली होती. पण ऑक्टोबर महिना सुरू होताच पुण्यातला कोरोनाचा आलेखही हळहळू खाली घसरू लागला आणि कधीकाळी देशात सर्वाधिक वेगाने वाढणारा पुण्यातला कोरोना आता पूर्णतः नियंत्रणात आला.

पुण्यातील कोरोना कसा फैलावला?

- 9 मार्चला पहिला पेशंट सापडला

- 22 मार्चपासून पुण्यात लॉकडाउन

- सलग 3 महिने लॉकडाउन करूनही कोरोना नियंत्रणाबाहेरच

- जून महिन्यात अॅक्टिव्ह रूग्णसंख्या 19 हजारांवर गेली

- बेड्स आणि उपचाराअभावी मृत्यूदर 5 टक्क्यांवर !

- जुलै महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या 1 लाखांवर

- पुण्यात पुन्हा लॉकडाऊन 2 करावं लागलं

- पुन्हा लॉकडाउन करूनही पुणे कोरोना रूग्णवाढीत देशात नंबर 1

पण या सगळ्या कसोटीच्या काळातही प्रशासनाने मात्र,  कोरोना टेस्टिंगची संख्या कुठेही कमी होऊ दिली नाही. किंबहुना त्यामुळेच आज पुण्यातली कोरोनाची साथ आटोक्यात आणणं शक्य झालं असल्याचं पालिका आय़ुक्त  विक्रम कुमार आणि महापौर मुरलीधर मोहोळ सांगतात.

पुण्यातील कोरोना कसा आटोक्यात आला ?

गेल्या 7 महिन्यात तब्बल दीड लाख रूग्ण कोरोनामुक्त

दैनंदिन रूग्णसंख्या 2 हजारांवरून तीनशेवर घसरली.

कोरोना अॅक्टिव्ह रूग्णसंख्या 19 हजारांवरून 5 हजारांवर

तर रूग्ण रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर पोहोचली त्यामुळे पुणे देशात नंबर 1 शहर बनले. त्याचबरोबर

टेस्टिंगचा Positivity रेट 32 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर घसरला. मृत्यूदर 5 टक्क्यांवरून 2.40 टक्क्यांवर आणि

रूग्णवाढ दुपटीचा रेट 30 दिवसांवरून 200 दिवसांवर

येऊन पोहोचला.

कोरोनाच्या या महामारीत फक्त पुणे शहरच होरपळून निघालं असं नाहीतर पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचा भागही तितकाच होरपळून निघाला. म्हणूनच पुणे जिल्ह्याची कोरोना रूग्णसंख्या ही 3 लाखांच्यावर जाऊन पोहोचली होती. पण शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातली साथ ही उशिराने सुरू होऊनही लवकर आटोक्यात आल्याचं झेडपी सीईओ आयुष प्रसाद सांगतात. आणि याचं श्रेय ते अर्थातच रॅपिड टेस्टिंग आणि माझं कुटुंबं माझी जबाबदारी या अभियानाला देतात.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार