सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्य परिवहन महामंडळाकडून आज परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Aishwarya Dubey
  • Aug 8 2020 4:27PM

गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. तिजोरीत खडखडात झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अखेर राज्य सरकारने निधी मंजूर केल्यानंतर आज कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून आज परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकानुसार, एसटी कर्मचाऱ्यांना आजच पगार हा बँक खात्यात जमा होणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील थकीत पगार सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मार्च महिन्यातील थकीत 50 टक्के  एप्रिल 75 टक्के तर मे महिन्यातील 100 थकीत वेतन एसटी कामगारांना मिळणार आहे.

 

गेल्या महिन्याचा 50 टक्के या महिन्याचा 100 टके पगार देण्यात येणार आहे. मे महिन्याचा पगार सुद्धा देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर जून आणि जुलै महिन्यातील पगारही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या  खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच यापूर्वी कोरोना महामारीत कपात केलेला पगारही मिळणार आहे.

 

मंगळवारीच राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी 550 कोटी मंजूर  केले होते. राज्य सरकारने निधी मंजूर केल्यानंतर आज कर्मचाऱ्यांना पगाराचे वाटप करण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार