सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात कोरोनाचं संकट वाढलं

कोरोनाचं हे वाढतं संकट लक्षात घेता पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले आहेत

Aishwarya Dubey
  • Jul 9 2020 9:28AM

पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. पुणे शहरात बुधवारी 1147 रुग्णांची वाढ झाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात दिवसभरात एकूण 1618 नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातही एकाच दिवसात 168 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळेपुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32596वर पोहोचली आहे. कोरोनाचं हे वाढतं संकट लक्षात घेता पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले आहेत.

कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शहरालगत हिंजवडी आणि मारुंजी परिसरात आजपासून 8 दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत.9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध,मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. तसंच या भागातील आयटी कंपन्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

दुसरीकडे, हवेली तालुक्यातील नांदेड गाव, खडकवासला, किरकीटवाडी ,नऱ्हे,मांजरी, पिसोळी, वाघोली, न्यू कोपरे,खानापूर,गुजर निंबाळकरवाडी,वडाची वाडी, लोणी काळभोर,भिलारे वाडी ,उरुळी कांचन, शेवाळेवाडी, भिलारे वाडी कदमाक वस्ती,कुंजीर वाडी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांना लागण झाली. त्यासोबतच इतरही काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याने आता राजकीय वर्तुळात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार