सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदी डॉ. राजू पाटोदकर रुजू

डॉ. पाटोदकर हे 1999 पासून माहिती व जनसपंर्क महासंचालनालयात कार्यरत आहेत.

Abhimanyu
  • Sep 16 2021 12:24PM

पुणे  : माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदी डॉ. राजू पाटोदकर यांची मंत्रालयातून नियुक्ती झाली आहे. त्यांनी उपसंचालक पदाचा कार्यभार आज स्वीकारला.

            यावेळी ‍जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे व प्रदर्शन सहायक निलीमा आहेरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, माहिती सहाय्यक संदीप राठोड,  दूरमुद्रणचालक विलास कसबे, ज्ञानेश्वर कोकणे, लिपिक नि टंकलेखक स्वाती साळुंके, सुहास सत्वधर, मिलींद भिंगारे, साऊंड रेकार्डस्टि संजय गायकवाड, कॅमेरा सहायक संतोष मोरे, छायाचित्रकार चंद्रकांत खंडागळे, वाहनचालक मोहन मोटे, विलास कुंजीर, जितेंद्र खंडागळे, सुनील झुंजार, संजय घोडके, रोनिओ ऑपरेटर रावजी बाबंळे, शिपाई पांडुरंग राक्षे, विशाल तामचीकर, मीरा गुथालिया आदि अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.
   डॉ. पाटोदकर हे 1999 पासून माहिती व जनसपंर्क महासंचालनालयात कार्यरत आहेत. यांनी यापूर्वी कोकण विभागीय माहिती कार्यालयात सहायक संचालक, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी त्याचप्रमाणे  मंत्रालयात  जलसंपदा, गृह विभाग, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, उद्योग  विभागांसाठी विभागीय संपर्क अधिकारी म्हणूनही काम केले.

   त्याचप्रमाणे डॉ. पाटोदकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून जर्नालिझम मध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र, पत्रकारिता, मराठी, नाट्यशास्त्र, या विषयात एम. ए. केले आहे.  जी.डी.सी.अँड ए, आणि हिंदी पंडित या पदव्याही त्यांनी मिळवलेल्या आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार