सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्थानिक गुन्हे शाखा विभाग, यवतमाळच्या अधिकाऱ्यांनी आवळ्या रेतीमाफियाच्या मुसक्या

पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक ,स्थागुशा. यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नीलेश शेळके यांच्या पथकांची धडक कारवाई .

Aishwarya Dubey
  • May 11 2020 12:28PM

हदगाव दि. 8 मे (अरविंद जाधव)   विदर्भ व मराठवाडा या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीमधून अवैद्य रेतीचा  बेसुमार उपसा होत असून रात्रंदिवस रेती माफिया  रेतीची तस्करी करीत आहेत. हदगाव तालुक्यात येणाऱ्या  बनचिंचोली, हरडफ, गोर्लेगाव ,गुरफळी , कोथळा ,वाकोडा तसेच  विदर्भातील उमरखेड तालुक्यात येणाऱ्या  चालगणी, साखरा, खरुस, कारखेड,  देवसरी, आधी गावातून  रेती माफिया  रेतीचा बेसुमार उपसा करीत आहेत . पण हदगाव महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन  यांची रेती माफिया सोबत मिलीभगत असल्यामुळे  थातूरमातूर कारवाई करून लगेच रेतीची अवैध तस्करी करणाऱ्यांना सोडून दिल्या जात आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी या रेती माफियांच्या नुसत्या आवळणे काळाची गरज आहे, परंतु त्यांचेच प्रशासनातील तालुकास्तरावरील अधिकारी-कर्मचारी रेतीची अवैध तस्करी करणाऱ्यांना अभय देत असल्याचे जनमाणसात बोलल्या जात आहे. काल दिनांक 7 रोजी यवतमाळ स्थानिक गुन्हे विभागाला अवैद्य रेतीचे उत्खनन करणाऱ्याची माहिती मिळाली की लगेच त्यांनी तात्काळ सापळा रचून छापा टाकला असता दोन ट्रॅक्टर तीन मोटरसायकल पकडण्यात आले ,व रीतसर संबधित रेती माफियावर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला, असल्याची माहिती स्थानिक गुन्हा विभाग यवतमाळ यांनी दिली.यवतमाळ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. एम राजकुमार व अपर पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर ,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले पोलीस उप निरीक्षक निलेश शेळके यांच्या पथकाने रेती माफियांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या. त्यामुळे विदर्भाच्या हद्दीतून मराठवाड्यातील रेती तस्कर रेतीचे अवैध उत्खनन करून हदगाव तालुक्यातील व शहरात अनेक ठिकाणी रेतीची अवैध विक्री करत आहेत परंतु यवतमाळ जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक येऊन मराठवाड्यातील रेती तस्करांना पकडून त्यांच्यावर कार्येवाई करून मुसक्या आवळतात परंतु मराठवाड्यातील असणाऱ्या हदगाव महसूल विभाग व पोलिस प्रशासन यांच्यावर ही का नामुष्कीची वेळ यावी अशी जनमानसात चर्चा मोठ्या चवीने चर्चिला जात आहे.
  काल गुरुवारी विदर्भातून 
एलसिबि यांच्या पथकाला गोपनीय माहीती मिळाली की ऊमरखेड तालुक्यातील लोहरा ग्राम शिवारातील पैनगंगा नदी पात्रातअसलेल्या रेती घाटावरून बाभळी, बनचिंचोली ता. हदगाव जिल्हा नांदेड या गावांतील कांही लोक ट्रॅक्टर द्वारे रेतीची चोरटी वाहातूक करतात ट्रॅक्टर मालक रस्त्यात काही अडथळा आहे का यांची पहानी करण्यासाठी मोटरसायकलवर सदर परिसरात पाळत ठेवत असतात.अशी माहीती मिळाल्यावरून पोउप निरीक्षक निलेश शेळके यांच्या पथकासह माहीतीची खातरजमा करन्या करीता ऊमरखेड येथे रवाना होवून ऊमरखेड येथील गौन खनिज चोरीपथकाचे नायब तहसीलदार विश्वंभर राणे  याच्या कार्यालयातील तलाठी सुरवसे पंजाब, सानप यांना पंच म्हनुन सोबत घेऊन सदर परिसरात रवाना होवून मौजे लोहार शिवारातील परिसरात असलेल्या पैनगगा नदी पात्रात कारवाई केली आसता नदीपात्रात दोन ट्रॅक्टर तिन टू व्हीलर उभ्या असलेल्या व ट्रॅक्टर मधे रेती भरने सूरू असलेले दिसल्याने छापा टाकला असताना मजूर व इतर लोकांनी पळ काढला १ ट्रॅक्टर चालक संदीप विलासराव पोघरे वय २१ हदगाव त्याची रेती वाहतूक सबंधाने चौकशी केली असता रेती वाहतुकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही, तसेच सदरील चोरटी वाहतूक करनारे ट्रॅक्टर मालक रमेश नरवाडे रा, बाभळी ,
तोहसिप फयूम शेख  हदगाव ,
रामदास पोळ बनचीचोली 
याच्या करिता करीत असल्याचे चौकशीत समोर आले. आरोपी संदीप पोघरे यास ताब्यात घेवून अवैध रित्या रेती वाहतूक करण्याकरिता असलेले २ ट्रॅक्टर तिन टूहीलर व इतर साहीत्य असा १३,१०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपी संदीप पोघरे व अशा चार लोकाविरूध पोलिस स्टेशन ऊमरखेड येथे  ३७९/३४भादंवी प्रमाने गुन्हा दाखल करन्यात आला असून मजूर व ट्रॅक्टर मालक यांचा शोध सूरू आहे .
सदरील कामगिरी मा ,पोलिस अधीक्षक श्री. एम. राजकुमार अप्पर पोलिस अधीक्षक श्री. नूरल हसन, पोलिस निरीक्षक 
प्रदीप शिरस्कर 
स्था.गू.शा.यवतमाळ याच्या मार्गदर्शनात पोउपनी निलेश शेळके, पोहवा/गोपाल वासटर, पोना/मून्ना आडे, पंकज पातूरकर चासफौ/ रेवन जागृत सर्व स्थागूसा यवतमाळ यांनी पार पाडली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभाग यवतमाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार