देशभरामध्ये इंधनाचा दर वाढता आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईमध्ये दर गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलचे दर नव्वदीपार आहेत. आता पुण्यामध्ये देखील पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 93.14 रुपये प्रति लीटर आहेत. यूपीए सरकारच्या काळात 2013 मध्ये हे दर 93 रुपये प्रति लीटरवर पोहोचले होते. त्यांनतर आज रेकॉर्ड स्तरावर पेट्रोलचे दर पोहोचले आहेत. पेट्रोलचे भाव एवढ्या स्तरावर पोहोचल्याने त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर देखील उतरले होते.
ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढीलप्रमाणे आहेत इंधनाचे दर
पेट्रोल- 93.14 रुपये प्रति लीटर
डिझेल- 82.38 रुपये
सीएनजी- 55.50 रुपये
दररोज सकाळी 6 वाजता बदलते इंधनाची किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.