सरकारी तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव उच्च स्तरावर आहेत. राजस्थानमधील गंगानगर याठिकाणी बुधवारी पेट्रोलचे दर सर्वाधिक म्हणजे 98.10 रुपये प्रति लीटर झाले आहेत याठिकाणी डिझेलचे दर 89.73 रुपये प्रति लीटर आहेत. हे दर देशातील सर्वाधिक दर आहेत. मुंबईमध्ये अद्याप पेट्रोलचे दर नव्वदीपारच आहेत. आज मुंबईत पेट्रोल 94.12 रुपये तर डिझेल 84.63 रुपये प्रति लीटर आहे.
का वाढल्या इंधनाच्या किंमती?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. याचा थेट परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ विक्रीवर होत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 60 डॉलर प्रति बॅरल झाले होते. यामुळेच देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव वधारले आहेत.
तुमच्या शहरात काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई- पेट्रोल 94.12 रुपये आणि डिझेल 84.63 रुपये प्रति लीटर
पुणे- पेट्रोल 93.78 रुपये आणि डिझेल 83.02 रुपये प्रति
दिल्ली- पेट्रोल 87.60 रुपये आणि डिझेल 77.73 रुपये प्रति लीटर
कोलकाता- पेट्रोल 88.92 रुपये आणि डिझेल 81.31 रुपये प्रति लीटर
चेन्नई- पेट्रोल 89.96 रुपये आणि डिझेल 82.90 रुपये प्रति लीटर
दररोज अपडेट केले जातात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.