सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली

४० जणांना वाचवण्यात यश

Aishwarya Dubey
  • Aug 6 2020 9:55AM

गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, शहरातील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात आलं आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आगीचं कारण आद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार नवरंपुऱ्यातील कोविड डेडिकेटेड श्रेय रुग्णालयात पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. सध्या आगीचं कारणं स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार