सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रांजणोली टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटर मधील दुर्दैवी घटना ; केडीएमसी क्वारंटाईन सेंटर मधून एकाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या?

भिवंडी येथील रांजणोली टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये एका रुग्णाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.केडीएमसी क्वारंटाईन सेंटर मधून एका कोरोना रुग्णाने इमारती वरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १९ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे

Aishwarya Dubey
  • Jul 22 2020 11:03AM
कल्याण - भिवंडी येथील रांजणोली टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये एका रुग्णाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.केडीएमसी क्वारंटाईन सेंटर मधून एका कोरोना रुग्णाने इमारती वरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १९ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे
त्यात रुग्णाचा जागीच मृत्यू झाला असून हे कोविड सेन्टर केडीएमसी प्रशासनाच्या अंतर्गत येते त्यामुळे नक्की रुग्णाची मानसिकता ठीक नव्हती की काही नशा केली होती? याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समजणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने अनेक खाजगी रुग्णालयांना कोविड -१९ सेन्टर बनविले आहे, त्यापैकी भिंवडी बायपास जवळ टाटा आमंत्रा मध्ये केडीएमसी मधील कोरोना प्रादुर्भाव असणाऱ्या रुग्णाना क्वारंटाईन सेंटर दाखल केले जातात रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास इमारतीतील ९१७ रूम मधी ३५ ते ४० वर्षीय रुग्णाने उडी मारून आपले प्राण संपवले आहे त्यामुळे कोविड सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दोन दिवसापूर्वी पनवेल कोविड सेन्टर मधील महिला बलात्कार प्रकरण ताजे असतानाच भिवंडीत बायपास जवळील टाटा आमंत्रा कोविड सेंटर मध्ये रुग्णाने उडी घेऊन आपले प्राण संपवल्या नंतर परिसरात खळबळ माजली आहे.
मयत कोरोना रुग्णाने नशा केली होती की मानसिक रित्या आजारी होता ? की यामध्ये काही प्रशासनाची चूक होती याचा भिवंडी पोलिस तपास करीत आहेत. त्याच बरोबर रुग्णाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर खरी सत्यता समोर येईल.इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले असेल हे अहवाल आणि तपासाअंती स्पष्ट होईल,मात्र या घटनेमुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली आहे .

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार