सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आधी साधूंची हत्या आता त्यांच्याच वकिलाचा अपघात ?

गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने साधूंच्या पक्षात बाजू मांडणाऱ्या वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा काल अपघाती मृत्यू झाला. बुधवार १३ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास भाईंदर येथून डहाणू न्यायालयाकडे निघालेल्या त्रिवेदी यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण भागातील खिंडीत अपघात झाला. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Aishwarya Dubey
  • May 15 2020 11:33AM

पालघर : गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने साधूंच्या पक्षात बाजू मांडणाऱ्या वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा काल अपघाती मृत्यू झाला. बुधवार १३ मे रोजी सकाळी १०च्या सुमारास भाईंदर येथून डहाणू न्यायालयाकडे निघालेल्या त्रिवेदी यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण भागातील खिंडीत अपघात झाला. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत प्रवास करणारी त्यांची सहकारीही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या घटनेवर गंभीर प्रतिक्रिया उमटत असून हा अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वकील दिग्विजय त्रिवेदी बहुजन विकास आघाडी राजकीय पक्षाचे विधी सेल हाताळत असत. त्यांच्या निधनानंतर, ट्विटरवर पालघर प्रकरणाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पालघर पोलिस, महाराष्ट्र डीजीपी यांना टॅग करत विचारणा केली जात आहे की या प्रकरणात कोण सामील आहे. हे सर्व पूर्वनियोजित आहे का ? अशा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत. काही नागरिक तर या घटनेला हत्या मानत असून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करत आहेत.

साधूंचे मारेकरी माकप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते : सीआयडी कारवाईत समोर आले सत्य
साधूंच्या हत्येत सहभागी असलेल्यांचे व्हिडीओ समोर आले होते. त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विष्णू भावर साधूंना मारताना दिसतो. विष्णू भावर याला सीआयडी ने ताब्यात घेतले आहे. राजेश राव, विनोद राव व रामदास राव या तिघांनाही सीआयडीकडून अटक करण्यात आली. राजेश राव, विनोद राव आणि रामदास राव तिघेही माकपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समजते. दरम्यान जाणक्या बोरसा नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा साधूंना मारतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जाणक्या बोरसा यालाही सीआयडीने ताब्यात घेतले आहे. सारा प्रकार गैरसमजातुन घडला व यात राजकीय सहभाग नाही, अस वारंवार सांगणाऱ्या सर्वांचे पितळ या अटकेच्या कारवाईमुळे उघडे पडले आहे.

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १४१ झाली आहे. तर अल्पवयीन आरोपींच्या संख्येत आता एकाने वाढ होऊन एकूण १० जण भिवंडी येथील बाल सुधार गृहात आहेत. गुरुवारी खूनाच्या सहा नव्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १९मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आधीच अटकेत असलेल्या १०६जणांपैकी ५ जणांना न्यायालयाने १६मे पर्यंत पोलिस कोठडी दिली असून, उर्वरीत १०१ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले असले तरी त्यातील, ४० जणांना तिसऱ्या गुन्ह्यात (आरोपींना अटक करताना हल्ला करणे) अटक करण्यात आली असून त्यांना १८ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तसेच, १९आरोपींना आधीच पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार